26/11 च्या हल्ल्यात अजमल कसाबला (Ajmal Kasab) पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना (police officers) त्यांच्या या शौर्याबद्दल बक्षीस मिळणार आहे. याआधी वेतन वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) 2020 मध्ये घेतला असून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
26/11 च्या हल्ल्यात अजमल कसाब सोबत अन्य नऊ जणांनी हल्ला केला होता. यापैकी आठ जणांचा खात्मा करण्यात आला होता. या हल्ल्यात अजमल कसाबला जिवंत पकडण्यात पोलीस यशस्वी ठरले. या घटनेनंतर 2020 मध्ये तब्बल 12 वर्षांनी पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या टीमला वन स्टेप प्रमोशन (One step promotion) देण्याचा निर्णय घेतला. वन स्टेप प्रमोशन म्हणजेच ज्या पदावर आहेत त्याच्या वरील पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना जेवढा पगार मिळतो तेवढा पगार देण्यात येतो.
15 पोलिसांना बक्षीस देण्याचे आदेश गृहमंत्रालयाने (Home Ministry) जारी केले असून यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल (Police Constable) व अधिकारी दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या आदेशाची अंमलबजावणी लवकरच होणार आहे.