new variant of Corona  lokshahi
लोकशाही स्पेशल

New Covid Variant सावधान | कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'XE' आला, Omicron पेक्षा जास्त खतरनाक

कोरोना विषाणू XE चे नवीन प्रकार समोर आले आहे

Published by : Team Lokshahi

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona Virus) संपूर्ण जगाची चिंता वाढवली होती. आता कुठे कोरोनाचा (Covid-19) वेग मंदावत चालला होता. भारतामध्ये कोरोना रुग्ण (Corona Patient in India) संख्या कमी होत चालली आहे. पुन्हा कोरोना विषाणूच्या साथीने संपूर्ण जगाचा तणाव वाढला आहे. कोरोना विषाणू XE (Corona New Variant)च्या नवीन प्रकाराने दार ठोठावले आहे. WHO ने म्हटले आहे की, हे नवीन प्रकार Omicron BA.2 पेक्षा 10 पट जास्त संसर्गजन्य आहे. याचा अर्थ ओमिक्रॉनच्या मूळ प्रकारापेक्षा ते ४३ टक्के वेगाने पसरते. XE प्रकार हे ओमिक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 या दोन व्हेरिएंटने बनलेले आहे. हा व्हेरिएंट सध्या जगभरातील काही देशांमध्येच दिसला आहे. WHO ने एका अहवालात म्हटले आहे की, 'एक्सई रीकॉम्बिनेंट (Ba.1-Ba.2) सर्वात आधी 19 जानेवारी रोजी यूकेमध्ये आढळून आला. आतापर्यंत, या प्रकाराची 600 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सीच्या ( UKHAS) च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की सध्या 3 हायब्रिड कोविड प्रकार चालू आहेत. डेल्टा आणि BA.1 च्या संयोजनातून जन्मलेल्या XD आणि XF चे दोन भिन्न प्रकार आहेत तर तिसरा XE आहे. एक्सडी डेल्टा बहुतेक फ्रान्स, डेन्मार्क आणि बेल्जियममध्ये सापडला आहे. XD एकापेक्षा जास्त देशांमध्ये पसरला आहे. XF हे ओमिक्रॉनच्या डेल्टा आणि BA.1 पासून तयार झाले आहे. हा व्हेरिएंट यूकेमध्ये सापडला होता. पण 15 फेब्रुवारीपासून हा व्हेरिएंट सापडला नाही.

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू