भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. हा दिवस भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण (सी.व्ही. रमन) यांनी लावलेल्या “रमन प्रभाव” च्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा प्रसंग आपल्या वैज्ञानिक समुदायाच्या योगदानाची प्रशंसा करण्यासाठी आणि देशाच्या विकासात त्यांच्या योगदानाबद्दल जनजागृती करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून देखील काम करतो.
संशोधनाची आवड असणाऱ्या रामण यांचा जन्म तेव्हाच्या मद्रास प्रांतातील तिरुचिरापल्ली येथे झाला. त्यांच्या कुटुंबामध्ये शिक्षणाचा वारसा होता. याच वातावरणाचा फायदा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर झाला. अवघ्या १६ व्या वर्षी पदवी आणि १८ व्या वर्षी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करुन त्यांनी पहिला शोध निबंध (Research paper) प्रसिद्ध केला. पुढे काही काळ सरकारी नोकरी केली. तेव्हा कामकाज संपवून ते अन्य संशोधनावर अभ्यास करत असत. थोड्याच कालावधीमध्ये त्यांना लोकप्रियता मिळाली. त्यांचे संशोधन सातासमुद्रापार गेले.
दरवर्षी प्रमाणे, भारत या वर्षी देखील 28 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन (NSD) साजरा केला जाणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या म्हणण्यानुसार, या वर्षीच्या सोहळ्याची थीम “विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान” असेल.