लोकशाही स्पेशल

National Science Day : …म्हणून आज राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करतात

Published by : Shweta Chavan-Zagade

देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस (National Science Day ) म्हणून साजरा करण्यात येतो. देशाचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन (Scientist c. v. Raman) यांनी आजच्या दिवशी जी किमया केली होती. त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन (Scientist c. v. Raman) यांनी रामन परिणामाचा (Raman Effect)शोध लावला. यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिवस'  (National Science Day )  म्हणून साजरा केला जातो.

चंद्रशेखर वेंकट रामन यांनी कोलकाता विद्यापीठात 1917-1933 भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. तेथेच त्यांनी भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख पद भूषवले. तसेच 1947 साली ते बंगळुरुमधील रामन संशोधन संस्थेचे संचालक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक संशोधन संस्था आणि विद्यापीठांना उभारणीत रामन यांचा मोलाचा वाट होता. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना 1954 साली भारत सरकारकडून भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 21 नोव्हेंबर 1970 रोजी त्यांचे बंगळुरुमध्ये निधन झाले.

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे उद्दीष्ट

विज्ञानात रुची वाढवण्यासाठी आणि समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' (National Science and Technology Conference) व 'विज्ञान आणि तंत्रज्ञान' (Science and technology) मंत्रालयाकडून या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती कायम ठेवणे. यासह, देशात अणुऊर्जेविषयी असलेली लोकांच्या मनातील भीती दूर करणे हे त्याचे मुख्य उद्दीष्ट आहे. केवळ अणुऊर्जेने देशाचा अथक विकास सुनिश्चित केला जाऊ शकतो. समाजातील लोकांचे जीवनमान उंचावेल आणि विकसित होऊ शकेल, हे उदिष्ट असते.

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...