Money Management Tips in Marathi: असं म्हटलं जातं की, आपलं आंथरूण पाहून पाय पसरावे. मात्र, ही एक म्हण नाही तर आर्थिक जगतातील सर्वात मोठा मंत्र आहे. या म्हणी बाबत अनेकांना माहिती असते मात्र, तरी सुद्धा लोक याच्या अगदी उलट करताना दिसून येतात.
जेव्हा खर्चाचा विचार येतो तेव्हा अनेकांच्या मनात विचार येतो की, आपण कमावत कशासाठी आहोत? आयुष्य एकदाच मिळालं आहे आपल्याला हवे तसे आणि हवे तेवढा पैसा खर्च करुन आयुष्य एन्जॉय करुया. मजा-मस्ती करुया, मित्रांसोबत पार्टी करुया, कुठेतरी फिरायला जाऊया असे अनेक प्लान्स बनवले जातात. मात्र, जेव्हा भविष्यात एखादी अडचण येते तेव्हा पैशांची गरज भासते आणि सेव्हिंग किंवा गुंतवणुकीच्या नावावर आपल्याकडे शून्य रक्कम असते. मात्र, आम्ही तुम्हााल सांगितले की, तुम्ही मजा-मस्ती, पार्टी केल्यानंतर 50, 30, 20 चा फॉर्म्युला फॉलो करुन सेव्हिंग करु शकता तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे शक्य आहे
जेव्हा आपण कमवायला सुरुवात करतो तेव्हा खर्च सुद्धा त्याच पद्धतीने करु लागतो. अनेकदा पैशांचं योग्य नियोजन न केल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत 50, 30 आणि 20 हा नियम फॉलो करायला हवा. याचा अर्थ असा होतो की, व्यक्तीने आपल्या पगाराचे तीन भाग करायला हवेत. 50 टक्के, 30 टक्के आणि 20 टक्के. यापैकी पगारातील 50 टक्के रक्कम ही आपल्या आवश्यक गरजांसाठी, घरातील खर्चासाठी, खाणे-पिण्यासाठी वापरु शकता. 30 टक्के रक्कम ही तुमचे शौक पूर्ण करण्यासाठी, सिनेमा पाहण्यासाठी आणि फिरण्यासाठी वापरू शकता. तर 20 टक्के रक्कम गुंतवणूक करु शकता. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या पगारातील 20 टक्के रक्कम जर सेव्हिंग केली तर एका वर्षात त्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये चांगली रक्कम जमा होईल. याचा विचार आपण भविष्यात येणाऱ्या एखाद्या अडचणीच्या वेळी वापरु शकतो.
समजा की, तुमचा पगार 1 लाख रुपये इतका आहे. यापैकी तुम्ही 50 हजार रुपये म्हणजेच 50 टक्के रक्कम प्रत्येक महिन्याला खर्च करु शकता. यापैकी 30 टक्के रक्कम म्हणजे 30 हजार रुपयांत तुम्ही तुमचे शौक पर्ण करु शकता. उरलेले 20 हजार रुपये तुम्ही गुंतवणूक करु शकता. जर तुम्ही वर्षभर प्रत्येक महिन्याला 20 हजार रुपये गुंतवणूक कराल तर एका वर्षात जवळपास 2 लाख 40 हजार रुपयांपर्यंत तुम्ही सेव्हिंग करु शकता. हा पैसा तुम्ही संकटाच्या काळात, अडचणीच्या काळात वापरु शकता.