२००५ सालापासून १० जुलै सर्वत्र मातृ सुरक्षा दिन साजरा केला जातो. माता आणि होणाऱ्या मातांच्या चांगल्या आरोग्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मातांच्या आरोग्याबाबत जनजागृतीसाठी हा दिवस साजरा केला जातो.
१० जुलै ही तारीख निवडण्यामागचे कारण म्हणजे दुसऱ्या दिवशी ११ जुलैला जगभरात जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला होता. मातृ सुरक्षा दिनामध्ये मातेच्या पोटी जन्म घेणाऱ्या दोन अपत्यांमध्ये योग्य ते अंतर असणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व सांगितले आहे.
गर्भवती असताना होणाऱ्या मातेने आपली योग्य ती काळजी घेतली पाहिजे. गर्भारपणात योग्य काळजी घेतली नाही तर प्रसूतीदरम्यान मातांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांची काळजी घेणं गरजचे असते.
जर दोन मुलांच्या जन्मादरम्यान योग्य अंतर राखले गेले नाही तर मातेचे तसेच बाळाचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. तिचे आरोग्य चांगले राहिले तर भविष्यात बाळाचे आरोग्य चांगले राहते. रण मातृ सुरक्षा दिनामध्ये मातेच्या पोटी जन्म घेणाऱ्या दोन अपत्यांमध्ये योग्य ते अंतर असणे किती गरजेचे आहे याचे महत्त्व सांगितले आहे. जर दोन मुलांच्या जन्मादरम्यान योग्य अंतर राखले गेले नाही तर मातेचे तसेच बाळाचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते.