Maharashtra Krishi Din 2023: भारत हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात शेतकऱ्यांचे खूप महत्व आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या कामाची दखल घेण्यासाठी आपल्या राज्यात 1 जुलैला कृषी दिन साजरा केला जातो. हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला जातो. कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने 1 जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो.
महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त फोटोच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शुभेच्छा नक्की द्या. यासाठी तुम्हाला खालील ईमेज डाऊनलोड करता येतील.
करून शेती उगवून धान
यातचं खरी बळीराजाची शान
महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा.
इडा पीडा टळो आणि
बळीचे राज्य येवो!
महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा.
शेतकरी आहे अन्नदाता तोच आहे
देशाचा खरा भाग्यविधाता
कृषी दिनाच्या शुभेच्छा
भागवितो भूक तिन्ही लोकांची
लक्ष लक्ष तुझे आभार
कृषी दिनाच्या
राज्यातील सर्व शेतकऱ्यांना
मनपूर्वक शुभेच्छा.
महाराष्ट्रातील
“शेतकरी राजाला”
महाराष्ट्र कृषी दिनाच्या शुभेच्छा.