Maharashtra Agricultural Day : भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. महाराष्ट्र हे देशातील प्रमुख उत्पादक राज्य म्हणून गणले जाते. 1 जुलै रोजी महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. हा दिवस महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त साजरा केला जातो. या दिवशी शेतकऱ्यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जातात. त्यासोबतच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांचा गौरव केला जातो
इतिहास
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्र कृषी दिन किंवा महाराष्ट्र कृषी दिवस साजरा केला जातो. वसंतराव फुलसिंग नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी झाला. १९६३ ते १९७५ या काळात ते राज्याचे मुख्यमंत्रीही होते. जेव्हा पासुन वसंत नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासुन त्यांनी कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी सदैव योगदान दिले असे म्हटले जाते.
महत्व
या दिवशी राज्यभरात अनेक उत्सवांचे आयोजन केले जाते.महाराष्ट्रात कृषी दिनाला विशेष महत्त्व आहे. देशाची तसेच राज्याची अर्थव्यवस्था मुख्यत: कृषी क्षेत्रावरच अवलंबून आहे. महाराष्ट्र राज्यही कृषी क्षेत्रात एक अग्रगण्य राज्य समजलं जातं.