लोकशाही स्पेशल

'लोकशाही मराठी'चा आज 'लोकशाही संवाद 2024'; दिग्गज नेत्यांची हजेरी

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Published by : Dhanshree Shintre

लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे 'लोकशाही संवाद 2024' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'लोकशाही संवाद 2024' या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. दिवसभर मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दलही चर्चा होणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष विधानसभा राहुल नार्वेकर, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, उद्योगमंत्री उदय सामंत, अध्यक्ष युवासेना आदित्य ठाकरे, आमदार विधान परिषद पंकजाताई मुंडे, कौशल्य, रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

'लोकशाही संवाद 2024' या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण तुम्ही आज सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लोकशाही मराठी न्यूज चॅनलसोबतच डिजिटल प्लॅटफॉर्मवरही पाहु शकता. लोकशाही युट्युब चॅनेलवर हा कार्यक्रम दिवसभर लाईव्ह दाखवण्यात येणार आहे.

Follow us on:

Website: https://www.lokshahi.com/

Facebook: https://www.facebook.com/LokshahiMarathi/

Instagram: https://www.instagram.com/lokshahimarathi/

Twitter: https://twitter.com/LokshahiMarathi

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु