लोकशाही स्पेशल

नेते मंदिरात : योगी मंदिरात तर भगवंत मान यांची गुरुद्वारात प्रार्थना

Published by : Team Lokshahi

5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, निकालाचा (Result) आज दिवस आला. सत्तेचा मुकुट मिळेल की नाही, हा संभ्रम सकाळी होता.
एक वेळेस पुन्हा जिंकण्याच्या कामनेने योगी पोहचले मंदिरात

यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मंदिरात पोहचले. पुन्हा एकदा सत्तेसाठी देवाकडे विजयाची प्रार्थना केली.

भगवंत मान गुरुद्वारात पोहोचले

पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पार्टीचे AAP मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी गुरुद्वारामध्ये विजयासाठी प्रार्थना केली. मतमोजणी सुरू होण्यापूर्वी मान संगरूरमधील (Sangrur) गुरुद्वारा गुरसागर मस्तुआना (Gursagar Mastuana) येथे पोहोचले. विधानसभेच्या 117 जागांसाठी पंजाबमधील मतमोजणी (Counting of votes) सुरू आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी केली पूजा
डॉ.प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी कुटुंबासह श्री दत्त मंदिर, सांखळी येथे विजयासाठी प्रार्थना केली. सावंत यांनी फोटो ट्विट करून लिहिले – सांखळी येथील श्री दत्त मंदिरात पूजा केली.

मणिपूरचे मुख्यमंत्री (Chief Minister of Manipur) वीरेन सिंह प्रवक्ता संबित पात्रा यांच्यासोबत श्री गोविंदा मंदिरात पोहोचले.

मणिपूरमध्ये भाजपचे BJP सीएम उमेदवार वीरेन सिंह (Viren Singh) आणि प्रवक्ते संबित पात्रा (Sambit Patra) यांनी श्री गोविंदा मंदिरात जाऊन विजयासाठी प्रार्थना केली. मंदिरात पूजा केल्यानंतर दोघेही प्रदक्षिणा करताना दिसले.

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Black circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result