Kojagiri Purnima 2023 : वर्षातील १२ पौर्णिमापैकी कोजागिरी पौर्णिमा ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. ही पौर्णिमा शरीर, मन आणि धनासाठी उत्तम आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र 16 कलांनी भरलेला असतो जो आपल्या किरणांमधून अमृताचा वर्षाव करतो. चंद्रप्रकाशाचे प्रतिक म्हणून दूधाचे प्राशन केले जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मित्र-मैत्रिणी, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना खास शुभेच्छा द्या.
मंद प्रकाश चंद्राचा, त्यात गोडवा दुधाचा, विश्वास वाढू दे नात्याचा, त्यात असू दे गोडवा साखरेचा…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य घेऊन येणारी ठरो… हीच आमची मनोकामना…
कोजागिरी पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ, प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात ऋणानूबंधाचा हात…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!
प्रकाश चंद्रमाचा, आस्वाद दुधाचा, साजरा करू य सण कोजागिरीचा…
कोजागिरी पोर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
कोजागिरीचे चांदणे, हसतंय माझ्या अंगणात, दुग्धशर्करा योग यावा, जसा साऱ्यांचा जीवनात… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!