हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमेला खुप महत्वाचे स्थान आहे. अश्विन महिन्याच्या शुल्क पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाते. यंदा कोजागिरी पौर्णिमा 16 ऑक्टोबर 2024 ला साजरी केली जाणार आहे. कोजागिरी पौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा असते. या दिवशी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम साजरे केले जातात. तर कोजागिरी पौर्णिमेच्या तुमच्या कुटुंबाला तसेच प्रियजनांना द्या या शुभेच्छा...
आकाशगंगा तेजोमय झाली,
नभात चंद्रफुलांची उधळण झाली,
कोजागिरीचा चंद्र पाहण्या वसुंधराही आतुर झाली…
कोजागिरी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!
केशरयुक्त दुधाची चवदार साथ,
ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात,
म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान,
दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात…
कोजागिरी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!
प्रकाश चंद्रमाचा,
आस्वाद दुधाचा,
साजरा करू य सण कोजागिरीचा...
कोजागिरी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!
आली कोजागिरी पौर्णिमा,
शरदाचे चांदणे घेऊन,
कोण कोण जागे हे पाहते लक्ष्मी दाराशी येऊन...
कोजागिरी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!
चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ,
प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात,
असू दे ऋणानूबंधाचा हात…
कोजागिरी पौर्णिमेच्या मनापासून शुभेच्छा!