लोकशाही स्पेशल

World Music Day 2024: जाणून घ्या 'जागतिक संगीत दिन'चा इतिहास आणि महत्त्व

संगीताची आवड नसलेली क्वचितच कोणी असेल. संगीत ही अशी गोष्ट आहे जी लोकांच्या हृदयावर आणि मनावर खोलवर परिणाम करते.

Published by : Dhanshree Shintre

संगीताची आवड नसलेली क्वचितच कोणी असेल. संगीत ही अशी गोष्ट आहे जी लोकांच्या हृदयावर आणि मनावर खोलवर परिणाम करते. या कारणास्तव, संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल जगभरातील गायक आणि संगीतकारांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आज (21 जून) रोजी जगभरात 'जागतिक संगीत दिन' साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांमध्ये संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

'जागतिक संगीत दिन' जगातील 32 हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी अनेक देशांमध्ये संगीताचे कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे सादर केले जातात. भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, अमेरिका, जपान, चीन, ब्राझील आणि मेक्सिको या देशांतील संगीतकार या दिवशी त्यांच्या वादनाने सुंदर परफॉर्मन्स देतात.

जागतिक संगीत दिन पहिल्यांदा फ्रान्समध्ये 21 जून 1982 रोजी साजरा करण्यात आला. फ्रान्सचे सांस्कृतिक मंत्री मॉरिस फ्ल्युरेट यांनी एक प्रस्ताव ठेवला होता, जो 1981 मध्ये स्वीकारण्यात आला होता. यानंतर, फ्रान्सचे पुढील सांस्कृतिक मंत्री, जॅक लँग यांनी 1982 मध्ये हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर 21 जून 1982 रोजी पहिल्यांदा 'जागतिक संगीत दिवस' साजरा करण्यात आला.

जागतिक संगीत दिनाचे महत्त्व

या दिवसाचे आयोजन शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संगीताबद्दल लोकांची आवड वाढवण्यासाठी केले जाते, कारण संगीत जीवनात शांती आणि आनंद देते. या कारणास्तव बहुतेक लोकांना संगीत ऐकणे आवडते. काहींना दुःख कमी करण्यासाठी संगीत ऐकायला आवडते, तर काहीजण आनंदात संगीत ऐकण्याला महत्त्व देतात. इतकेच नाही तर अनेक प्रकारच्या समस्यांवर मात करण्यासाठी म्युझिक थेरपीही अनेक वेळा दिली जाते.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश