दर महिन्यात 2 चतुर्थी असतात. कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी म्हणतात आणि शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष सध्या सुरू आहे. त्यामुळे या महिन्यातील चतुर्थी संकष्टी चतुर्थी येत्या 21 सप्टेंबरला साजरी होणार आहे.
वैदिक पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 20 सप्टेंबर रोजी रात्री 9:15 वाजता सुरू होईल. जी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:13 वाजता समाप्त होईल. या तिथीला चंद्रदर्शनाचा शुभ मुहूर्त रात्री 8:29 आहे. उदयतिथी पडल्यामुळे 21 तारखेला संकष्टी चतुर्थी साजरी होणार आहे.
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024 रोजी रात्रौ 09 वाजून 15 मिनिटांनी भाद्रपद पितृपक्ष संकष्ट चतुर्थी प्रारंभ होणार आहे. शनिवार, 21 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 06 वाजून 14 मिनिटांनी भाद्रपद पितृपक्ष संकष्ट चतुर्थी समाप्ती होणार आहे. भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे शनिवार, 21 सप्टेंबर 2024 रोजी संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण करावे, असे सांगितले जात आहे. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे. मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करावी, असे सांगितले जाते.