लोकशाही स्पेशल

VIDEO | ‘झिंगाट’वर किशोरी पेडणेकरांचाही भन्नाट डान्स पाहिलात का ?

Published by : Vikrant Shinde

महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पक्षाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मनसोक्त डान्स (Dance) केला. या कार्यक्रमात महिलांसोबत झिगांट या गाण्यावर ताल धरला. आता या कार्यक्रमाचा व्हिडीओ (Video) व्हायरल झाला आहे. जागतिक महिला दिनाच्या (Women's Day) निमित्ताने जागृत मंचतर्फे (Jagrut Manch) महिलांसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती आणि सहभाग पाहायला मिळाला आणि कार्यक्रमाचा आनंद घेताना दिसत आहेत.

या कार्यक्रमा दरम्यान किशोरी पेडणेकर म्हणाल्या, नगरसेवक (Corporator) म्हणून पाच वर्ष पूर्ण झाली. आता नवीन इनिंग सूरू होईल. आता जोमाने पुन्हा काम करू. एक परिचारिका म्हणून काम केले होते. मग कोरोनाकाळात स्थिती हाताळण्याची संधी मिळाली. नवीन प्रारभात पक्षाची बांधणी करण्यासाठी तयारी करू. मी देवाचे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे आभार मानते.

कोरोना काळात देशात मुंबई अव्वल आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेनीं दिलेल्या जबाबदाऱ्या आम्ही व्यवस्थीत पार पाडून, आव्हानांना संधी समजून काम करू, असे त्या म्हणाल्या. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा (Shivsena) भगवा फडकणार, लोकांच्या प्रतिसादाने शिवसेनेचा महापौर असेल. सोबतच सध्या सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती