International Youth Day : राष्ट्राच्या उभारणीत आणि विकासात तरुणांची महत्त्वाची भूमिका आहे. केवळ तरुणच देशाचे भविष्य ठरवतात. असे म्हटले जाते की एखाद्या देशाची तरुण पिढी जितकी अधिक शिक्षित आणि निरोगी असेल, तितक्या वेगाने तो देश प्रगती करेल. तरुण हा समाजाचा आरसा असतो. त्यामुळेच दरवर्षी १२ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो. यानिमित्त आपल्या मित्र-मैत्रिणींना हे संदेश पाठवून शुभेच्छा देऊ शकता.
उभे रहा, धैर्यवान व्हा, मजबूत व्हा,
सर्व जबाबदारी आपल्या डोक्यावर घ्या,
लक्षात घ्या की तुम्ही तुमच्या नशिबाचे निर्माते आहात
युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
स्वतंत्र होण्याचे धाडस करा,
जिथपर्यंत तुमचे विचार जातात,
तिथपर्यंत जाण्याचे धाडस करा,
विचारांना आयुष्यात उतरवण्याचे धाडस करा,
युवा दिनाच्या शुभेच्छा
कोणतेही काम करण्यापूर्वी हार मानू नका
अन्यथा त्या कामात कधीच यश मिळणार नाही
युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
तुम्ही जे काही विचार करता, तेच तुम्ही व्हाल,
स्वत:ला कमकुवत समजाल तर कमकुवत व्हाल
स्वत:ला बलवान समजाल तर बलवान व्हाल
युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला लागता तेव्हा आयुष्य सुरू होते…
त्यामुळे आधी स्वतःवर विश्वास ठेवा, त्यानंतर जग तुमच्यावर विश्वास ठेवेल…
युवा दिनाच्या शुभेच्छा
नेतृत्व करताना सेवक बना, नि:स्वार्थी राहा
अनंत धैर्य बाळगा, शेवटी यश तुमचेच आहे
युवा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा