नृत्य किंवा डान्स हा केवळ एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचाच नव्हे तर संबंधित संस्कृतीचा आत्मा असतो. नृत्यावरून त्या संस्कृतीचा अंदाज लावता येतो. नृत्य हे मानवाच्या अभिव्यक्तीचा अविष्कार आहे. आपल्या शरीराच्या माध्यमातून विविध भावना व्यक्त करण्याचं ते एक माध्यम आहे. मनुष्याच्या आयुष्यात असलेल्या या नृत्याचे महत्व जगाला पटवून देण्यासाठी दरवर्षी 29 एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस साजरा केला जातोय.
दरवर्षी हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातोय. पण या वर्षी कोरोनाची प्रादुर्भाव लक्षात घेता हा दिवस साजरा करण्यावर बंधने आली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला जातोय.