लोकशाही स्पेशल

International Coffee Day 2023: कॉफी आणि बरंच काही

आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

Published by : Team Lokshahi

आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. कॉफी व्यवसायाशी संबंधित असलेल्या कॉफीशी संबंधित व्यक्तींच्या प्रयत्नांना ओळखणे हा या दिवसाचा उद्देश आहे. कॉफी पिण्यास प्रोत्साहित करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या दिवसाद्वारे आम्ही त्या सर्व लोकांचा सन्मान करतो जे शेतातून दुकानापर्यंत कॉफी घेऊन जाण्यासाठी कठोर परिश्रम करतात. इंटरनॅशनल कॉफी ऑर्गनायझेशनने 2015 मध्ये इटलीतील मिलान येथे पहिला जागतिक कॉफी दिन आयोजित केला होता.

काही वर्षांपर्यंत कॉफी म्हणजे एक हायक्लास ड्रिंक असं म्हटलं जायचं. पण आता याची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन घराघरामध्ये कॉफी पोहचलेली दिसून येत आहे. कॉफीला अनेक उपमाही दिलेल्या आहेत. चहा म्हणजे उत्साह तर कॉफी म्हणजे स्टाईल. चहा म्हणजे मैत्री तर कॉफी म्हणजे प्रेम. जगभरात कोठेही जावा शाळा, कॉलेज आणि ऑफिस येथे आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये कॉफी लव्हर असतोच. चहा प्रेमीप्रमाणे प्रत्येकाच्या घरामध्ये एक कॉफी प्रेमी पाहायला मिळतोच.

कॉफी एक एक पेय आहे. अनेकांना कॉफी खूप आवडते. कॉफी जगभर प्यायली जाते. कॉफी तरतरी आणणारी, खास चव आणि स्वाद असलेली एक उत्तेजक पेय आहे. कॉफीमध्ये ग्रीन कॉफी, ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी, कोल्ड कॉफी, फिल्टर कॉफी, एस्प्रेसो कॉफी, कॅपुचिनो कॉफी, लाटे कॉफी, माकीयाटो कॉफी हे प्रकार ही अनेकजण आवडीने पितात. काही लोक तर कॉफीशिवाय जगूच शकत नाहीत. बरेचजण मूड फ्रेश ठेवण्यासाठी कॉफी पितात कॉफी पिल्यावर शरीरातील आळस आणि सुस्ती निघून जाते. त्यामुळे कॉफी लव्हर कॉफी पिण्यासाठी कधीच नाही बोलत नाहीत.

आंतरराष्ट्रीय कॉफी दिवसाचे महत्त्व

कॉफीची लागवड करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना आधार देणे हा आंतरराष्ट्रीय कॉफी दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश आहे. कॉफी हे या शेतकर्‍यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन आहे आणि कॉफी उत्पादकांच्या उत्पन्नात भरीव वाढ करणे, त्यांच्यासमोरील अडचणी जगासमोर आणणे आणि कॉफी उद्योगाला चालना देणे हा हा दिवस साजरा करण्याच्या महत्त्वाचा एक भाग आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी