लोकशाही स्पेशल

India Post Recruitment : दहावी पास आहात! येथे करा अर्ज, फक्त काहीच दिवस बाकी

Published by : Shweta Shigvan-Kavankar

India Post GDS Recruitment : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी पास तरुणांसाठी उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. इंडिया पोस्टने अलीकडेच ग्रामीण डाक सेवक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवार 11 जून रोजी किंवा त्यापूर्वी indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २२ मेपासून सुरू झाली आहे.

किती पदांची भरती होणार?

अधिकृत अधिसूचनेनुसार, इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवकाच्या 12,828 रिक्त पदांची भरती करेल. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना शाखा पोस्ट मास्टर पदांसाठी 12,000 ते 29,380 रुपये आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर पदांसाठी 10,000 ते 24,470 रुपये वेतन दिले जाईल.

अर्हता काय असेल?

भारतीय पोस्टमध्ये जीडीएस पदांसाठी भरतीसाठी किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 40 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. याशिवाय, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

निवड अशी असेल

भारतीय पोस्टमधील जीडीएस पदांसाठी भरतीसाठी निवड गुणवत्ता आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारावर केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांची यादी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. याशिवाय उमेदवारांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारेही माहिती दिली जाईल.

ऑनलाइन अर्ज करा

पात्र उमेदवार इंडिया पोस्ट जीडीएस भर्तीसाठी अधिकृत वेबसाइट indiapostgdsonline.gov.in द्वारे 11 जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. यासाठी सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये शुल्कही भरावे लागणार आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट देखील तपासू शकता.

Diwali 2024: फराळासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामध्ये असू शकते भेसळ! अशाप्रकारे ओळखा भेसळ...

MVA Press Conference: निवडणूक आयोग भाजपची बी टीम, संजय राऊतांचा निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टावर गंभीर आरोप

दम असेल तर...; महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमधून नाना पटोलेंनी दिलं महायुतीला आव्हान

भारताची वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार