15 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा आणि खास आहे. कारण याच दिवशी भारत ब्रिटीश राजवटी विरुद्ध स्वतंत्र्य झाला होता. यासाठी अनेक भारतीय सैनिकांनी ब्रिटीश राजवटी विरुद्ध लढा देऊन आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वत:ला फासावर चढवून आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांचा आणि नेत्यांचा संघर्ष फळाला आला. त्यामुळे प्रत्येक भारतीयासाठी 15 ऑगस्ट हा दिवस कधीही न विसरता येणारा असा आहे. अवघ्या जगाला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेहमी कौतुक वाटत आले आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येकासाठी देशभावना निर्माण करणारा आहे.
स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी, ज्यांनी माझा भारत देश घडविला
देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा...
धर्म तिरंगा कर्म तिरंगा, चराचरात तिरंगा,
घराघरात तिरंगा सत्य तिरंगा, नित्य तिरंगा,
हर घर तिरंगा, हर मन तिरंगा,
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
जगभरात घुमतोय भारताचा नारा
चमकतोय आकाशात तिरंगा आपला
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...