भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून तब्बल दीडशे वर्षांनी स्वातंत्र्य झाला आणि त्यानंतरचा प्रत्येक दिवस हा भारतासाठी सोनेरी दिवस म्हणून उगवला. 15 ऑगस्ट हा दिवस भारतासाठी आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचा आणि खास आहे. कारण याच दिवशी भारत ब्रिटीश राजवटी विरुद्ध स्वतंत्र्य झाला होता. यासाठी अनेक भारतीय सैनिकांनी ब्रिटीश राजवटी विरुद्ध लढा देऊन आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वत:ला फासावर चढवून आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारकांचा आणि नेत्यांचा संघर्ष फळाला आला. त्यामुळे प्रत्येक भारतीयासाठी 15 ऑगस्ट हा दिवस कधीही न विसरता येणारा असा आहे. अवघ्या जगाला भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे नेहमी कौतुक वाटत आले आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस भारतातील प्रत्येकासाठी देशभावना निर्माण करणारा आहे.
पण तुम्हाला माहित आहे का? भारताव्यतिरिक्त इतर ही काही देश आहेत जे 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतात. या देशात ही भारताप्रमाणेच मोठ्या जल्लोषात स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा केला जातो. भारताप्रमाणेच या देशांना ही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कठोर संघर्ष करावे लागले. आम्ही तुम्हाला अशा काही देशांबद्दल माहिती देणार आहोत जे भारताप्रमाणेच स्वातंत्र्यदिनाला विशेष मानतात आणि हा दिन साजरा करतात, जाणून घ्या या देशांबद्दल.
बहरीन
बहरीन हा देश 15 ऑगस्ट 1971 रोजी स्वातंत्र्य झाला. या देशाने ब्रिटिशांसोबत कठोर संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवले. 15 ऑगस्ट रोजी बहरीन आणि ब्रिटन या दोन्ही देशांमध्ये एक करार झाला आणि त्यानंतर या दोन्ही देशातील वाद कमी होत यांच्यात मैत्रीचे संबंध निर्माण होऊ लागले. यामुळे बहरीन या देशातील लोकसंख्येच्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वेक्षणानंतर देशाने ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य घोषित केले.
काँगो
आफ्रिकेतील काँगो या देशाने 15 ऑगस्ट 1960 रोजी फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळवले. हा देश 1880 पर्यंत फ्रेंच राजवटीत असताना या देशाला फ्रेंच राज्यकर्त्यांकडून काँगो या नावावे ओळखळू जात होते. यानंतर फ्रेंच राजवटीपासून सुटका मिळवून हा देश 1903 मध्ये मध्य कांगो म्हणून ओळखला जाऊ लागला.
दक्षिण कोरिया
हा देश जपानपासून 15 ऑगस्ट 1945 रोजी स्वतंत्र झाला. जपानच्या ताब्यात असताना अमेरिका आणि सोव्हिएत सैन्याने कोरियाला जपानच्या ताब्यातून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मदतीचा हातच पुढे केला होता. त्यामुळे भारताप्रमाणेच दक्षिण कोरिया हा देश देखील 15 ऑगस्ट हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करतो.