लोकशाही स्पेशल

Shivrajyabhishek Sohala 2024: शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा कसा पार पडला होता? जाणून घ्या...

Published by : Dhanshree Shintre

दुर्गराज रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 351 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवप्रमेंचा उत्साह दिसून येत आहे. 6 जून रोजी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त सध्या रायगडावर दाखल झाले आहेत. तर मग शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा याबद्दल जाणून घेऊया.

रायगडी तो सुवर्ण क्षण आला… न भूतो न भविष्यती असा एक सोहळा रायगडाने अनुभवला… डोळ्यांचे पारणे फेडणारा तो सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा! प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी देखील आपण शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत. 6 जून हा दिवस संपूर्ण जगभरात शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. 6 जून 1674 रोजी इतिहासाने हा सुवर्णक्षण रायगडी अनुभवला.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पुरोगामी विचारसरणीचा विद्वान पंडित गागाभट्ट याच्याकडून करण्याचे निश्चित झाले होते. शिवराज्याभिषेक घटनाक्रम खालील प्रमाणे आहे.

30 मे 1674 : (शनिवार) - शिवाजी महाराजांचे मौजीबंधन झाल्यामुळे शास्त्रानुसार राण्यांशी पुन्हा विवाह होणे आवश्यक होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी समंत्रक विवाह केले. या विवाहामुळे राजा म्हणून शिवाजी महाराज आणि पट्टराणी म्हणून सोयराबाई यांना राज्याभिषेकासाठी लागणारे हक्क शास्त्रानुसार प्राप्त झाले. वा. सी. बेन्द्रे म्हणतात, "लग्नविधी समंत्रक झाल्याने वैदिक पध्दतीप्रमाणे राज्याभिषेकविधी सपत्नीक करण्यास शास्त्रानुसार मोकळीक झाली. "

31 मे 1674 : (रविवार) - रविवारी ऐन्द्रीशांतीच्या कार्यास प्रारंभ झाला. अग्नीप्रतिष्ठा करण्यात आली. इंद्राणीची पूजा, चतुष्कभस्थापन, ऐशानयाग इ. विधी पार पाडण्यात आले. आचार्य आणि ऋत्विज यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली.

1 जून 1674 (सोमवार) - ग्रहयज्ञ व त्यानंतर नक्षत्रहोम हे विधी करण्यात आले.

2 जून 1674 (मंगळवार) - मंगळवार व नवमी राज्याभिषेकाच्या कार्यास निषिध्द असल्यामुळे या दिवशी कोणताही विधी करण्यात आला नाही.

3 जून 1674 (बुधवार) - नक्षत्रयज्ञ करण्यात आला.

4 जून 1674 (गुरूवार) - या दिवशी रात्री निर्ऋतियाग हा यज्ञ पार पडला. मांस, मत्स्य व मंदिरा यांची याप्रसंगी आहुती देण्यात आली. यागानंतर स्नान करून पुण्याहवाचन करण्यात आले.

5 जून 1674 (शुक्रवार) - हा दिवस राज्याभिषेक समारंभाचा सातवा आणि मुख्य दिवस होता. ब्राम्हणभोजन आणि ऐन्द्रीशांतीच्या मुख्य कार्यांची समाप्ती करण्यात आली. राज्याभिषेकाचा मुहूर्त त्रयोदशीचा असल्यामुळे सायंकाळपासून पहाटेपर्यंत हा मंगलविधी सुरू होता. राज्याभिषेक समारंभ शुक्रवार दि. 5 जून रोजी सायंकाळपासून सुरूवात होऊन तो शनिवार दि. 6 जून 1674 रोजी सकाळी पूर्ण झाला.

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी