Republic Day 2024 : यंदा आपण 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि आपला देश लोकशाही प्रजासत्ताक बनला. या निमित्ताने सर्व देशवासीय हा दिवस अत्यंत अभिमानाने आणि कृतज्ञतेने साजरा करतात. याप्रसंगी सोशल मीडिया साईटवर देशभक्तीपर शुभेच्छा, कोट्स, कविता आणि संदेश ठेवून हा दिवस साजरा करा.
तीन रंग प्रतिभेचे नारंगी,
पांढरा अन हिरवा रंगले न जाणे
किती रक्ताने तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
हे राष्ट्र देवतांचे,
हे राष्ट्र प्रेषितांचे
आ चंद्रसूर्य नांदो
स्वातंत्र्य भारताचे
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!
उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी
भारतदेश घडविला….
प्रजासत्ताक दिनाच्या, सर्वांना हार्दिक शुभेच्छा