लोकशाही स्पेशल

Dahi Handi Wishes 2024: गोविंदा रे गोपाळा...! दहीहंडीला 'द्या' प्रियजनांना या खास शुभेच्छा

दहीहंडीच्या निमित्ताने शुभेच्छा देणारे काही मेसेजेस, फोटो, पोस्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. इमेजेस, मेसेजेस व्हॉट्सअपवर शेअर करुन किंवा स्टेट्स तुम्ही ठेवून मित्रांना, नातेवाईकांना आणि प्रियजनांना दहीहंडीच्या शुभेच्छा देऊ शकता.

Published by : Dhanshree Shintre

Dahi Handi Wishes 2024: दहीहंडी हा सण कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्याच दिवशी साजरा केला जातो. दहीहंडी दिवशी उंचीवर दोरीच्या साहाय्याने दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजविलेली हंडी टांगली जाते आणि गोविदांची पथके एकावर एक थर रचून ही हंडी फोडतात. सार्वजनिक दहीहंडीच्या कार्यक्रमात हजारो-लाखो रुपयांची बक्षिसे ठेवली जातात. तुम्ही तुमच्या प्रियजनांना सोशल मीडियावर दहीहंडीच्या शुभेच्छा मराठीत देऊ शकता.

फुलांचा हार

पावसाची सर

राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर

साजरा करुया गोपालकाल्याचा सण!

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!!

तुझ्या घरात नाही पाणी

घागर उताणी रे गोपाळा

गोविंदा रे गोपाळा,

यशोदेच्या तान्ह्या बाळा

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!!

दह्यात साखर, साखरेत भात

दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,

फोडूया हंडी लावून उंच थर,

जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!!

हंडीवर आमचा डोळा,

दह्या दुधाचा काला,

मटकी फोडायला आला

गोविंदा रे गोपाळा

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!!

गोविंदा आला रे आला

जरा मटकी सांभाळा बृजबाला

दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!!

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी