आषाढ शुक्ल पौर्णिमेला गुरुपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. यंदा आषाढ पौर्णिमा 20 जुलैपासून सुरू होऊन 21 जुलै रोजी संपणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, गुरु पौर्णिमेसाठी आवश्यक असलेली आषाढ शुक्ल पौर्णिमेची तारीख 20 जुलै रोजी संध्याकाळी 05:59 पासून सुरू होईल आणि 21 जुलै रोजी दुपारी 03:46 वाजता समाप्त होईल. ज्या दिवशी सूर्योदय होतो ती तारीख वैध आहे. आषाढ पौर्णिमा तिथीचा सूर्योदय 21 जुलै रोजी सकाळी 05:37 वाजता होईल. अशा परिस्थितीत गुरुपौर्णिमा रविवार, 21 जुलै रोजी साजरी होणार आहे.
गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु,
गुरुदेवो महेश्वर…
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरवे नमः
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु हाच देव आहे,
गुरु हाच श्वास,
गुरू हेच सुख
आणि गुरूचाच ध्यास...
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरुशिवाय ज्ञान नाही,
ज्ञानशिवाय आत्मा नाही,
ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म,
सगळी आहे गुरुची देन,
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरु म्हणजे आदर्श...
गुरु म्हणजे प्रमानतेची मुर्तिमंत प्रतिक
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
आईची माया
बाबांची सावली
हीच आहे आपली
गुरुंची माऊली
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!