लोकशाही स्पेशल

आली गौराई अंगणी...! गौरी आगमनाला खास मराठी शुभेच्छा देऊन द्विगुणीत करा आनंद

गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हंटले जाते. या मंगल पर्वाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं, फोटो, फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप स्टेटस शेअर करून गौरी आवाहन दिवसाच्या शुभेच्छा नक्की शेअर करा.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Jyeshtha Gauri Avahana 2023 : राज्यभरात गणपतींचे मोठ्या थाटामाटात आगमन झाले आहे. यानंतर आता ज्येष्ठा गौरींची स्थापना करण्यात येते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला म्हणजेच 21 सप्टेंबर 2023 रोजी अनुराधा नक्षत्रात गौरी आवाहन पाळण्यात येते. याला गौरी गणपती किंवा महालक्ष्मी पूजन देखील म्हंटले जाते. या मंगल पर्वाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्रं, फोटो, फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप स्टेटस शेअर करून गौरी आवाहन दिवसाच्या शुभेच्छा नक्की शेअर करा.

ज्येष्ठा गौरी आवाहनाच्या दिनी

गौराई तुमच्या घरात सुख, समृद्धी,

आनंद आणि भरभराट घेऊन येऊ दे

ही सदिच्छा!

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

गौराई माते नमन करते तुला

अखंड सौभाग्य लाभू दे मला

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

गौरी गणपतीच्या आगमना,

सजली अवधी धरती,

सोनपावलाच्या रुपाने

ती येवो आपल्या घरी,

होवो आपली प्रगती,

लाभो आपणास सुख समृद्धी

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

आली माझ्या गं अंगणी गौराई,

लाभो तुम्हास सुख समृद्धी,

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

आई गौराई गणाची, आली माझ्या गं अंगणी

संगे शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी

झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागेल

आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगेल

गौरी आवाहनाच्या शुभेच्छा!

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रिपदाचा बिहार पॅटर्न? नितीश कुमारांप्रमाणे शिंदेही पुन्हा मुख्यमंत्री होणार?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 'या' 21 महिला झाल्या आमदार

IPL Mega Auction 2025: पहिला दिवस संपन्न! "हे" स्टार खेळाडू झाले पहिल्या लिलावात मालामाल

चेहर्‍यावर दही लावण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स