लोकशाही स्पेशल

गगनयानचे बुस्टर तयार.. वालचंदनगर इंडस्ट्रीमध्ये बनविले गगनयानचे बुस्टर..

Published by : Lokshahi News

रुपेश होले : इस्त्रोणार्फत 2022 ला 'गगनयान' उपग्रह अवकाशात पाठविण्यात येणार आहे. या 'गगनयान' चे बुस्टर बारामती पासून 30 किलोमीटरवर असलेल्या वालचंदनगर इंडस्ट्रीमधे बनविण्यात आले आहे. हा इस्रोचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून इस्त्रो पहिल्यांदाच अवकाशात अंतराळवीरांना पाठविणार आहे.

इस्रो नेहमीच नवनवीन प्रयोग करतं आहे. यामुळे भारताची मान जगभरात नेहमीचं उंचावत आहे. आता भारताबरोबरच महाराष्ट्राचही नाव जगभर अभिमानानं घेतलं जाईल. कारण 2020 मधे इस्त्रो अवकाशात 'गगनयान' पाठविणारा आहे. या गगनयानाला अवकाशात पाठविण्यासाठी लागणारे बुस्टर हे इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीमधे बनविण्यात आलं आहे.

गगनयान अवकाशात पाठविण्यासाठी जी ताकद लागते. ती ताकद निर्माण करण्याचं काम बुस्टर करतो. हे तयार झालं असून त्यांची गुणवत्ता चाचणीही झाली आहे. येत्या 18 डिसेंबरला या बुस्टरचं ऑनलाईन उद्घाटनही होणार आहे. बुस्टर म्हणचे काय तर यान जमीनीवरुन अवकाशात उड्डानासाठी जो इंधनाचा साठा लागतो. तो या बुस्टर मधे भरला जातो.

अंतराळ मोहीमांच्या प्रक्षेपणा दरम्यान एखादा अपघात झाल्यास अंतराळ वीरांचे जीव वाचवण्यासाटी क्रूय एस्केप प्रणालिही कंपनीत तयार केली आहे. क्रूय एस्केप प्रणाली म्हणजेच यान किंवा बुस्टरचा स्फोट झाल्यास या क्रूय एस्केपमुळे यान आणि अंतराळवीर असणारा भाग हा यानापासून आपोआप दूर होईल. हा प्रकल्प प्राथमिक स्तरावर असून त्याचे कामही लवकर पूर्ण होईल. याशिवाय वालचंदनगर इंडस्ट्री येत्या काळात १८ प्रकारच्या मिसाईल साठी लागणारी सामग्री बनवणार आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result