Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले: 13 दिवसांच्या सरकारचे वाजपेयी पंतप्रधान

Published by : Team Lokshahi

भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.

सुविचार

चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात. पण चुक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात.

आज काय घडले

  • १९२९ मध्ये हॉलिवूडच्या अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्स अँड सायन्सेस या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ऑस्कर असे नाव पडले.

  • १९६९ मध्ये सोविएत रशियाचे व्हेनेरा-५ हे मानवविरहित अंतराळयान शुक्रावर उतरले.

  • १९७५ मध्ये सिक्कीम भारतात विलीन झाले. कांचनगंगा हे जगातील तिसरे सर्वात उंच पर्वतशिखर सिक्कीम व नेपाळच्या सीमेवर आहे.

  • १९७५ मध्ये जपानी गिर्यारोहक जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.

  • १९९६ मध्ये भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.

आज यांचा जन्म

  • हिंदुस्तानी संगीत व सुगम संगीताच्या गायक माणिक वर्मा यांचा १९२६ मध्ये जन्म झाला. त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.

  • भारतीय राजकारणी व लेखक नटवर सिंह यांचा १९३१ मध्ये जन्म झाला. देशाचे परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

आज यांची पुण्यतिथी

  • कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचे १९५० मध्ये निधन झाले.

  • समीक्षक, नाटककार, लेखक माधव मनोहर यांचे १९९४ मध्ये निधन झाले. चित्रपट समीक्षक व लेखक गणेश मतकरी हे त्यांचे नातू आहेत.

  • चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक फणी मुजुमदार यांचे १९९४ निधन झाले.

  • बालसाहित्याकरता प्रसिद्ध असलेले मराठीतील कवी, कथाकार माधव गोविंद काटकर यांचे २००० मध्ये निधन झाले.

  • टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचे २०१४ मध्ये निधन झाले.

IPL Mega Auction 2025 Live: केएल राहूल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत