Dinvishesh  Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : मुंबई शेअर बाजाराची सुरुवात

रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म, प्रा. हा. भ. प. शंकर वामन यांचे निधन

Published by : Team Lokshahi

सुविचार

यश हे सोपे असते. कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते, पण समाधान हे महाकाठीन असते. कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

आज काय घडले

  • १८७३ मध्ये मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला. आज मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे एकत्रित बाजार मूल्य २ लाख १८ हजार दक्षलक्ष रुपयांपेक्षा जास्त आहे.

  • १९४४ मध्ये ब्रिटीशांच्या राजवटीपासून भारताला स्वतंत्र करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले.

  • १९५१ मध्ये भारतातील पहिली पंचवार्षिक योजनेला सुरुवात करण्यात आली.

  • १९६९ मध्ये राष्ट्रीय वन्यजीव विभागातर्फे वाघाला भारताच्या राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा देण्यात आला.

  • २०११ मध्ये सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती करण्यात आली. जुबा ही दक्षिण सुदानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

आज यांचा जन्म

  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि जनसंघाचे पहिले सरचिटणीस रामभाऊ म्हाळगी यांचा १९२१ मध्ये जन्म झाला. भाजपचे विधानसभेतील ते पहिले आमदार होते.

  • प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ गुरूदत्त यांचा १९२५ मध्ये जन्म झाला. १९५० ते १९६० च्या दशकात त्यांनी अनेक उत्कृष्ट चित्रपटांची निर्मिती केली.

  • भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक के. बालाचंदर यांचा १९३० मध्ये जन्म झाला.

  • संजीव कुमार या नावाने प्रसिद्ध असलेला अभिनेते हरी जरीवाला यांचा १९३८ मध्ये जन्म झाला. १९६० सालातील हम हिंदुस्तानी या हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

आज यांची पुण्यतिथी

  • भारतीय महाराष्ट्रीयन तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ञ सार्थ ज्ञानेश्वरीचे लेखक प्रा. हा. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचे १९६८ मध्ये निधन झाले.

  • माजी नगरविकासमंत्री व लोकसभा सदस्य डॉ. रफिक झकारिया यांचे २००५ मध्ये निधन झाले.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result