सुविचार
ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.
आज काय घडले
१९३७ मध्ये जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.
१९६६ मध्ये कोका सुब्बा राव यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे ९ वे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ३० जून १९६६ ते ११ एप्रिल १९६७ या कालावधीत ते सरन्यायाधीश होते.
१९८६ मध्ये केंद्र सरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचा निर्णय झाला.
२००२ मध्ये ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला. ब्राझीलचे हे पाचवे विश्वविजेपद होते.
आज यांचा जन्म
कल्याणजी-आनंदजी या संगीतकार जोडीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा १९२८ मध्ये जन्म झाला. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
प्रसिद्ध भारतीय रसायनशास्त्रज्ञ सी. एन. आर. राव यांचा १९३४ मध्ये जन्म झाला. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे चौदाशे शोधनिबंध प्रकाशित झाले असून त्यांनी ४५ पुस्तके लिहिली आहेत.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट व दूरदर्शन पटकथा लेखक आणि दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांचा १९४३ मध्ये जन्म झाला.
अमेरिकन मुष्टीयोद्धा माइक टायसन यांचा १९६६ मध्ये जन्म झाला.
आज यांची पुण्यतिथी
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांचे १९१७ मध्ये निधन झाले.
मराठी नाटककार, कवी, अभिनेता आणि दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे १९९४ मध्ये निधन झाले.
दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे २००७ मध्ये निधन झाले.