Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : वीरप्पनकडून अभिनेते राजकुमारचे अपहरण

सोनू निगम यांचा जन्म, अशोक रानडे यांचे निधन

Published by : Team Lokshahi

सुविचार

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.

आज काय घडले

  • १९३० साली आयोजित पहिला फुटबॉल विश्वकप उरुग्वेच्या फुटबॉल संघाने जिंकला. उरुग्वेने अर्जेटिना संघाचा ४-२ अशा फरकाने पराभव केला.

  • १९६२ मध्ये ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे ८ हजार ३० किमी लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला.

  • २००० मध्ये अभिनेते डॉ. राजकुमार यांचे चंदन तस्कर वीरप्पन यांनी अपहरण केले होते.

  • २००० मध्ये कोणत्याही प्रवासी वाहनातून एखादा प्रवासी अपघाताने खाली पडून त्याचा मृत्यू झाल्यास त्याबद्दल त्या वाहनचालकाला जबाबदार धरता येणार नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला.

आज यांचा जन्म

  • अमेरिकन फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक व उद्योगपती हेनरी फोर्ड यांचा १८६३ मध्ये जन्म झाला.

  • पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महिला चिकित्सक व समाजसुधारक मुथुलक्ष्मी रेड्डी यांचा १८८६ मध्ये जन्म झाला.

  • पद्मश्री पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय इतिहासकार, संस्कृतज्ज्ञ व सौंदर्यशास्त्री गोविंदचंद्र पांडे यांचा १९२३ मध्ये जन्म झाले.

  • हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील श्रेष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर याचा १९२८ मध्ये जन्म झाला. पद्मश्री पुरस्कार व महाराष्ट्र भूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.

  • भारताचे माजी १६ वे मुख्य निवडणूक आयुक्त आणि लेखक नवीन चावला यांचा १९४५ मध्ये जन्म झाला.

  • हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय पार्श्वगायक सोनू निगम यांचा १९७३ मध्ये जन्म झाला. काही हिंदी चित्रपटांत त्यांनी नायकाच्या भूमिकाही केल्या आहेत.

आज यांची पुण्यतिथी

  • कर्नाटकसिंह म्हणून प्रसिद्ध असणारे भारतीय स्वातंत्र्य सैनिक व महात्मा गांधी यांचे सहकारी गंगाधर बाळकृष्ण देशपांडे यांचे १९६० मध्ये निधन झाले.

  • भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व नाट्य संगीताचे गायक वसंतराव देशपांडे यांचे १९८३ मध्ये निधन झाले.

  • मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव शंकर पाटील यांचे १९९४ मध्ये निधन झाले. ते ‘बालभारती’चे संपादक होते.

  • अर्थतज्ज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमीचे संस्थापक डॉ. विनायक महादेव तथा वि. म. दांडेकर यांचे १९९५ मध्ये निधन झाले.

  • संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भरतीय संगीतकार, गायक व मानववंशशास्त्रज्ञ अशोक दामोदर रानडे यांचे २०११ मध्ये निधन झाले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी