सुविचार
समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
आज काय घडले
१९२० मध्ये जगातील पहिली हवाई टपाल सेवा अमेरिकेतील न्यूयॉर्क ते सॅन फ्रान्सिस्को या शहरांदरम्यान सुरू झाली.
१९४८ मध्ये दुसऱ्या महायुद्धामुळे बंद असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुमारे १२ वर्षानंतर लंडनमध्ये सुरुवात झाली.
१९५७ मध्ये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेची स्थापना करण्यात आली. १५१ पेक्षा जास्त देश या संस्थेचे सदस्य आहेत.
१९८७ मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि श्रीलंकेचे अध्यक्ष जे. आर. जयवर्धने यांनी भारत-श्रीलंका शांती करारावर हस्ताक्षर केले.
आज यांचा जन्म
भारतीय उद्योजगत पितामहा जे. आर. डी. टाटा उर्फ जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा यांचा १९०४ मध्ये जन्म झाला. ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक होते.
महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मानित साहित्यकार व इतिहास लेखक बळवंत मोरेश्वर पुरंदरे उर्फ बाबासाहेब पुरंदरे यांचा १९२२ मध्ये जन्म झाला.
मराठी व्यंगचित्रकार शिवराम दत्तात्रेय फडणीस यांचा १९२५ मध्ये जन्म झाला. त्यांची व्यंग्यचित्रं बघत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या.
भजन सम्राट म्हणून लोकप्रिय असलेले प्रसिद्ध भारतीय भावगीत व भजन गायक आणि संगीतकार अनुप जलोटा यांचा १९५३ मध्ये जन्म झाला.
भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, लेखक व चित्रपट निर्माता संजय दत्त यांचा १९५९ मध्ये जन्म झाला. त्यांच्या जीवनावर 'संजू" नावाचा चित्रपट निघाला आहे.
आज यांची पुण्यतिथी
भारतीय बंगाली समाजसुधारक, तत्वज्ञानी ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे १८११ मध्ये निधन झाले.
शिक्षणतज्ज्ञ व स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफ अली यांचे १९९६ मध्ये निधन झाले. ९ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधी यांच्या भारत छोडो आंदोलनाच्या वेळी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता.
महाराष्ट्रीयन मराठी सुगम संगीताचे प्रतिक म्हणून ओळखले जाणारे गायक-संगीतकार सुधीर फडके उर्फ बाबूजी यांचे २००२ मध्ये निधन झाले.
भारतीय हिंदी चित्रपट हास्य कलाकार व अभिनेते बद्रुद्दीन जमालुद्दीन काझी उर्फ ’जॉनी वॉकर यांचे २००३ मध्ये निधन झाले.
मराठी संत साहित्याचे विद्वान व गाढे अभ्यासक डॉ. निर्मल कुमार फडकुले यांचे २००६ मध्ये निधन झाले.
जयपूरचे महाराज सवाई मानसिंग यांच्या पत्नी व जयपूर राज्याच्या तिसऱ्या महाराणी महाराणी गायत्रीदेवी यांचे २००९ मध्ये निधन झाले.