सुविचार
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
आज काय घडले
१८२१ मध्ये दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम भागातील पेरू या देशाला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले.
१९३४ मध्ये पं. मदनमोहन मालवीय आणि बापूजी अणे यांनी काँग्रेस राष्ट्रीय पक्षाची स्थापना केली.
१९७९ मध्ये चौधरी चरण सिंह यांनी भारताचे पाचवे पंतप्रधान म्हणून सूत्रे घेतली. २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८० या काळात ते पंतप्रधान होते.
१९९९ मध्ये भारतीय धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांना पालोस मार ग्रेगोरिओस पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००१ मध्ये आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला.
आज यांचा जन्म
हिपॅटायटीस लसीचे जनक नोबल पुरस्कार विजेता अमेरिकन चिकित्सक बारुच सॅम्युअल यांचा १९२५ मध्ये जन्म झाला.
पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात उद्योगपती व हिंदुस्तान लिव्हरचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक शेखर गांगुली यांचा १९३५ मध्ये जन्म झाला.
आज यांची पुण्यतिथी
भारतातील कम्युनिस्ट क्रांतिकारक नेत्या व नक्सलवाद विरोधी आपले आंदोलन सुरु करणाऱ्या चारू मजूमदार यांचे १९७२ मध्ये निधन झाले.
राष्ट्रीय व राज्यस्तरीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक राजा ठाकूर उर्फ राजाराम दत्तात्रय यांचे १९७५ मध्ये निधन झाले.
अर्जुन पुरस्कार सन्मानित सलग आठ वेळचे राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारे बॅडमिंटनपटू सय्यद मोदी यांचे १९८८ मध्ये निधन झाले.
पद्मविभूषण व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका महाश्वेतादेवी यांचे २०१६ मध्ये निधन झाले.
भारतीय चित्रपट अभिनेता व सहकलाकार इंदर कुमार यांचे २०१७ मध्ये निधन झाले.