Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र

आर. डी. बर्मन यांचा जन्म, सॅम माणेकशॉ यांचे निधन

Published by : Team Lokshahi

अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्राची निर्मिती झाली.

सुविचार

जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

आज काय घडले

  • १९५४ मध्ये अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्कोजवळ ओबनिन्स्क येथे सुरू झाले.

  • १९६४ मध्ये दिल्लीत भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संग्रहालय बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • १९९८ मध्ये आग्नेय आशियामधील प्रमुख क्वालालंपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ खुला झाला.

आज यांचा जन्म

  • निबंधकार, लेखक शिवराम महादेव परांजपे यांचे १८६४ मध्ये जन्म झाला. ब्रिटिश शासनाच्या अन्यायविरुद्ध ‘काळ' या मराठी साप्ताहिकातून त्यांनी केलेली टीकात्मक पत्रकारिता मराठी पत्रकारितेच्या इतिहासातील मानदंड समजली जाते.

  • प्रख्यात मराठी कवी व लेखक दत्तात्रेय कोंडो घाटे उर्फ कवी दत्त यांचा १८७५ मध्ये जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण अहमदनगर येथील मिशन हायस्कूलमध्ये झाले

  • अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा १८८० मध्ये जन्म झाला.

  • संगीत दिग्दर्शक राहुलदेव बर्मन उर्फ आर. डी. बर्मन यांचा १९३९ मध्ये जन्म झाला. त्यांना बॉलिवूडमधील सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी एक मानले जाते.

  • पद्मश्री व अर्जुन पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट सेवानिवृत्त भारतीय धावपटू पी. टी. उषा यांचा १९६४ मध्ये जन्म झाला. १९८५ मध्ये इंडोनेशियात झालेल्या स्पर्धेत त्यांनी पाच सुवर्णपदक पटकवले होते.

आज यांची पुण्यतिथी

  • भारतीय इतिहासाच्या कालखंडातील प्रसिद्ध शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजीत सिंह यांचे १८३९ मध्ये निधन झाले.

  • शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले यांचे २००० मध्ये निधन झाले.

  • भारताचे आठवे सैन्यप्रमुख सॅम माणेकशॉ यांचे २००८ मध्ये निधन झाले. १९७१ च्या भारत-पाक युद्धात भारताने माणेकशॉ यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा जबरदस्त पराभव झाला व बांगलादेशाची निर्मिती केली.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result