Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : राज्यात तंबाखू, गुटखाच्या जाहिरातींना बंदी

कृती सनॉनचा जन्म, ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे निधन

Published by : Team Lokshahi

सुविचार

आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.

आज काय घडले

  • १७६१ मध्ये माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील ४थे पेशवे बनले.

  • १९९७ मध्ये द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांची सलग सातव्यांदा पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली. हा एक विक्रम आहे.

  • २००१ मध्ये सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला.

आज यांचा जन्म

  • पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ डॉ. पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा १९११ मध्ये जन्म झाला.

  • ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अॅलिन बॉर्डर यांचा १९५५ मध्ये जन्म झाला. १९७८ ते १९९४ पर्यंत ते ऑस्ट्रेलियन संघात होते.

  • भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक राहुल बोस यांचा १९६७ मध्ये जन्म झाला. १९९८ ते २०१० दरम्यान त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली.

  • सिने-अभिनेत्री कृती सनॉन हिचा १९९० मध्ये जन्म झाला. हिरोपंतीमधील भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

आज यांची पुण्यतिथी

  • किराणा घराण्याचे प्रवर्तक, रूद्र वीणाचे मधुर वादन उस्ताद बंदे अली खाँ बीनकार यांचे १८९५ मध्ये निधन झाले.

  • खलनायकाच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले हिंदी चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक अमजद खान यांचे १९९२ मध्ये निधन झाले.

  • दहावे उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे २००२ मध्ये निधन झाले. १९९७ ते २००२ या कालखंडात ते उपराष्ट्रपती होते.

  • भारताचे ११ वे राष्ट्रपती व प्रसिद्ध शास्त्रज्ञ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे २०१५ मध्ये निधन झाले. ते भारताच्या अंतराळ कार्यक्रम आणि क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमात सहभागी होते.

'कोकण सेनेचंच, फडणवीस-दादांचंही यावर शिक्कामोर्तब' रामदास कदम यांचं मोठं वक्तव्य

पुण्यात मनसेला मोठा धक्का; सरचिटणीस रणजित शिरोळेंचा मनसेला जय महाराष्ट्र

'सीएम व्हायचं असेल तर लोकांमध्ये उतरावं लागतं' शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Sulbha Gaikwad यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, कल्याणमध्ये महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज