पी. बंडोपाध्याय या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल कमांडोर बनल्या.
सुविचार
ज्या पायांना लहानपणापासून ऊन, वारा, पाऊस, पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत.
आज काय घडले
१९४९ मध्ये बेल्जियममधील महिलांना प्रथमच संसदीय निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क मिळाला.
१९७४ मध्ये नागपुरजवळील कोराडी येथे त्याकाळातील सर्वात मोठया वीज निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीला प्रारंभ झाला.
१९९९ साली शिवाजी महाराजांची मुद्रा असलेले दोन रुपयांचे नाणे चलनात आले. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थित हा समारंभ झाला.
२००० साली पी. बंडोपाध्याय या भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल कमांडोर बनल्या.
आज यांचा जन्म
वंदे मातरम् या गीताचे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा १८३८ मध्ये जन्म झाला. त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये त्यांनी हे गीत लिहिले.
कोल्हापूर येथील मराठयांच्या भोसले घराण्यातील शासक, समाजसुधारक व लोकशाहीवादी छत्रपती शाहू महाराज यांचा १८७४ मध्ये जन्म झाला. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभल्यामुळे राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.
विख्यात संगीतनाट्य गायक आणि नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचा १८८८ मध्ये जन्म झाला. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात त्यांनी हुबेहूब रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळाली.
अर्जुन पुरस्कार प्राप्त भारतीय हॉकी खेळाडू मनप्रीत सिंह यांचा १९९२ मध्ये जन्म झाला.
आज यांचे निधन
नोबल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन जीवशास्त्रज्ञ, चिकित्सक आणि रोगप्रतिकारक तज्ज्ञ कार्ल लैंडस्टीनर यांचे १९४३ मध्ये निधन झाले.
व.पु. काळे नावाने प्रसिद्ध असलेले मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार, कथाकथनकार वसंत पुरुषोत्तम काळे यांचे २००१ मध्ये निधन झाले.
भारतीय चित्रपट निर्माता यश जोहर यांचे २००४ मध्ये निधन झाले. त्यांनी धर्मा प्रोडक्शनची १९७६ मध्ये स्थापना केली होती.