Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : मुंबईत 24 तासांत तब्बल 995 मिमी पाऊस

मुग्धा गोडसे यांचा जन्म, भास्कर चंदावरकर यांचे निधन

Published by : Team Lokshahi

सुविचार

पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा. कारण जिंकलात तर स्वत:चा आत्मविश्वास जिंकेल आणि हारलात तर स्वत:चाच अहंकार हारेल.

आज काय घडले

  • १९५६ मध्ये जागतिक बँकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयकरण केले.

  • १९९८ मध्ये बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद यांना प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला.

  • १९९९ मध्ये भारत-पाकिस्तानात झालेल्या कारगिल युद्धात भारताने निर्णयाक विजय मिळवला. हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्कृष्ट उदाहरण आहे.

  • २००५ मध्ये मुंबई परिसरात २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला.

आज यांचा जन्म

  • नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा १८५६ मध्ये जन्म झाला.

  • भारतीय शास्त्रीय संगीतातील ग्वाल्हेरच्या घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित कृष्णराव शंकर यांचा १८९३ मध्ये जन्म झाला.

  • फॅशन मॉडेल आणि हिंदी चित्रपटांमधील अभिनेत्री मुग्धा गोडसे यांचा १९८५ मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • बंगालमधील पहिले वैज्ञानिक इतिहासकार, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेंद्रलाल मित्र यांचे १८९१ मध्ये निधन झाले.

  • भारतीय सितार वादक, शैक्षणिक, चित्रपट व नाट्य संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे २००९ मध्ये निधन झाले.

'कोकण सेनेचंच, फडणवीस-दादांचंही यावर शिक्कामोर्तब' रामदास कदम यांचं मोठं वक्तव्य

पुण्यात मनसेला मोठा धक्का; सरचिटणीस रणजित शिरोळेंचा मनसेला जय महाराष्ट्र

'सीएम व्हायचं असेल तर लोकांमध्ये उतरावं लागतं' शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Sulbha Gaikwad यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, कल्याणमध्ये महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज