लोकशाही स्पेशल

दिनविशेष 24 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Published by : shweta walge

Dinvishesh 24 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 24 मार्च रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००८: भूतान हे लोकशाही राष्ट्र बनले व प्रथमच निवडणुका घेण्यात आल्या.

१९९८: टायटॅनिक चित्रपटाला विक्रमी ११ ऑस्कर पुरस्कार मिळाले.

१९९३: शूमाकर-लेव्ही-९ या धूमकेतुचा शोध लागला. हा धूमकेतु जुलै महिन्यात गुरु ग्रहावर जाऊन आदळला.

१९७७: स्वातंत्र्यानंतर पहिलेच बिगर काँग्रेसचे सरकार येऊन मोरारजी देसाई पंतप्रधान झाले.

१९२९: लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरु झाले.

१९२३: ग्रीस हे राष्ट्र प्रजासत्ताक बनले.

१८९६: अ.एस. पोपोव यांनी इतिहासात पहिल्यांदाच रेडिओ सिग्नलचे प्रसारण केले.

१८५५: आग्रा आणि कलकत्ता या शहरांदरम्यान तारसेवा सुरू झाली.

१८३७: कॅनडा देशाने आफ्रिकन कॅनेडियन लोकांना मतदानाचा अधिकार दिला.

१६७७: दक्षिण दिग्विजयप्रसंगी शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे मुक्काम केला.

१३०७: देवगिरीचा वैभवशाली सम्राट रामदेवराव यादव यास मलिक काफूरने कैद करुन दिल्लीला नेले.

आज यांचा जन्म

१९८४: एड्रियन डिसूझा - भारतीय हॉकी खेळाडू

१९५१: टॉमी हिल्फिगर - अमेरिकन फॅशन डिझायनर

१९३०: स्टीव्ह मॅकक्वीन - हॉलिवूड अभिनेते (निधन: ७ नोव्हेंबर १९८०)

१९०३: अॅडॉल्फ बुटेनँड - जर्मन बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक - नोबेल पुरस्कार (निधन: १८ जानेवारी १९९५)

१९०१: अनब्लॉक आय्व्रेक्स - मिकी माऊसचे सहनिर्माते (निधन: ७ जुलै १९७१)

१७७५: मुथुस्वामी दीक्षीतार - तामिळ कवी व संगीतकार (निधन: २१ ऑक्टोबर १८३५)

आज यांची पुण्यतिथी

२००७: श्रीपाद नारायण पेंडसे मराठी साहित्यिक (जन्म: ५ जानेवारी १९१३)

१९८९: रुबेन डेव्हीड - भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक पद्मश्री (जन्म: १९ सप्टेंबर १९१२)

१९३०: हेन्री फॉल्स - फिंगरप्रिंटिंगचे जनक (जन्म: १ जून १८४३)

१८४९: योहान वुल्फगँग डोबेरायनर जर्मन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: १३ डिसेंबर १७८०)

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा