लोकशाही स्पेशल

आज काय घडले : आयएनएस विराट नौदलात दाखल

मृणाल गोरे यांचा जन्म, व्ही.व्ही.गिरी यांचे निधन

Published by : Team Lokshahi

आयएनएस विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.

सुविचार

बऱ्याच घटनांचा शेवट सुरुवात कशी झाली यावर अवलंबून असतो.

आज काय घडले

  • १९८२ मध्ये कर्नाटक राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये कन्नड भाषा शिकवण्याची सक्ती केली.

  • १९९६ मध्ये धावपटू मायकेल जॉन्सनने १९.६६ सेकंदांत २०० मीटर धावण्याचा विश्वविक्रम केला.

  • २००१ मध्ये आयएनएस विराट ही भारतीय नौदलाची एकमेव विमानवाहू नौका आधुनिकीकरणानंतर पुन्हा नौदलात दाखल झाली.

आज यांचा जन्म

  • रविकिरण मंडळाचे ते सदस्य श्रीधर बाळकृष्ण रानडे यांचा १८६२ मध्ये जन्म झाला. मराठीतील पहिली विज्ञानकथा त्यांनी लिहिली.

  • इतिहास, भाषाशास्त्र यावर व्यांसगपूर्ण संशोधन आणि लेखन केलेले विश्वनाथ राजवाडे यांचा १९६३ मध्ये जन्म झाला. त्यांनी संपादित केलेले 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते.

  • मराठी रंगभूमीचे नटसम्राट नानासाहेब फाटक यांचा १८९९ मध्ये जन्म झाला. त्यांनी “रक्षाबंधन” या नाटकातून नाट्यक्षेत्रात प्रवेश केला.

  • समाजवादी कार्यकर्त्या-राजकारणी मृणाल गोरे यांचा १९२८ मध्ये जन्म झाला. राष्ट्र सेवा दल संघटनेच्या माध्यमातून तरुणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली.

  • कादंबरीकार अनीता देसाई यांचा १९३७ मध्ये जन्म झाला. बुकर पारितोषिकासाठी त्यांची तीन वेळा निवड झालेली आहे.

आज यांची पुण्यतिथी

  • भारताचे चौथे राष्ट्रपती व्ही.व्ही.गिरी यांचे १९८० मध्ये निधन झाले. २४ ऑगस्ट १९६९ ते २४ ऑगस्ट १९७४ या काळात ते राष्ट्रपती होते.

  • ओडिसी नृत्यांगना संजुक्ता पाणीग्रही यांचे १९९७ मध्ये निधन झाले. त्यांच्या ओडिसी नृत्यकलेतील योगदानासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी