लोकशाही स्पेशल

दिनविशेष 24 जानेवारी 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Dinvishesh 24 January 2024 : सध्या जानेवारी महिना सुरू झाला आहे. तर जानेवारी महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 24 जानेवारी या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

१९८४: अ‍ॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.

१९७६: बर्मा शेल या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव भारत रिफायनरीज असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून भारत पेट्रोलियम (BPCL असे करण्यात आले.

१९७२: गुआममध्ये इ. स. १९४४ पासून लपलेला जपानी सैनिक शोइची योकोइ सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.

१९६६: एअर इंडियाचे कांचनगंगा हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.

१९४३: पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार.

१९४२: दुसरे महायुद्ध दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.

१९१६: नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.

१९०१: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

१८६२: बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.

१८५७: दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.

१८४८: कॅलिफोर्निया गोल्डरश कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले.

आज यांचा जन्म

१९४३: सुभाष घई - हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक

१९२४: कापुरी ठाकूर - बिहारचे ११वे मुख्यमंत्री (निधन: १७ फेब्रुवारी १९८८)

१९२४: रतन साळगावकर - मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्री (निधन: २३ ऑगस्ट १९७१)

१९२४: हंसा वाडकर - मराठी हिंदी चित्रपट अभिनेत्री (निधन: २३ ऑगस्ट १९७१)

१९२४: मेघश्याम रेगे - तत्त्वचिंतक (निधन: २८ डिसेंबर २०००)

आज यांची पुण्यतिथी

२०११: पंडित भीमसेन जोशी - भारतीय शास्त्रीय गायक स्वरभास्कर - भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२)

२००५: अनुताई लिमये - गोवा मुक्तिसंग्राम

१९६६: होमी जहांगीर भाभा - भारतीय भौतिकशास्त्रज्ञ - पद्मभूषण (जन्म: ३० ऑक्टोबर १९०९)

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा