बचेंद्री पाल यांनी १९८४ मध्ये जगातील सगळ्यात उंच शिखर एव्हरेस्ट सर केले. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या गिर्यारोहक आहेत.
सुविचार
कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.
आज काय घडले
१९४९ मध्ये दुसऱ्या महायुद्धातील मित्र राष्ट्रांनी जर्मनीला स्वातंत्र दिले. बॉन ही पश्चिम जर्मनीची राजधानी झाली. १९९० साली जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर पूर्व जर्मनी देश पश्चिम जर्मनीमध्ये विलिन करण्यात आला व जर्मनी हा देश पुन्हा एकदा एकसंध बनला.
१९८४ मध्ये बचेंद्री पाल यांनी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. एव्हरेस्ट सर करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या गिर्यारोहक आहेत.
आज यांचा जन्म
गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचा १८९६ मध्ये जन्म झाला. पार्श्वगायनाचा पहिला प्रयोग त्यांनी 'कृष्णावतार' या चित्रपटामध्ये केला.
जयपूर संस्थानच्या महाराणी गायत्री देवी यांचा जन्म १९१९ मध्ये झाला. १९६२ मध्ये लोकसभेची निवडणूक त्या विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या. त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने केली.
मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा १९२६ मध्ये जन्म झाला.
भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा १९४५ मध्ये जन्म झाला.
क्रिकेटपटू वूर्केरी रमण यांचा १९६५ मध्ये जन्म झाला. ते भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते.
आज यांची पुण्यतिथी
रॉकफेलर घराण्यातील पहिले उद्योगपती, स्टँडर्ड ऑईल उद्योगसमूह व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिल्या तेल उद्योगाचे संस्थापक जॉन डेव्हिसन रॉकफेलर यांचे १९३७ मध्ये निधन झाले.
भारतीय क्रिकेटर माधव मंत्री यांचे २०१४ मध्ये निधन झाले.