Dinvishesh Team Lokshahi
लोकशाही स्पेशल

आज काय घडले : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची लिट्टेकडून हत्या

सुश्मिता सेन झाली मिस युनिव्हर्स

Published by : Team Lokshahi

पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे आत्मघातकी पथकाने हत्या केली. त्यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची फाशीची शिक्षा जन्मठेपेत करण्यात आली.

सुविचार

पैसा कधीही मिळवता येतो. पण निघून गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसे कधीच मिळत नाहीत.

आज काय घडले

  • १९२७ मध्ये चार्ल्स लिंडबर्ग यांनी न थांबता अटलांटिक महासागर पार केला. या प्रकारचे उड्डाण करणारे ते पहिले व्यक्तीमत्व ठरले.

  • १९९१ मध्ये पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे आत्मघातकी पथकाने हत्या केली. या घटनेत लिट्टे या संघटनेचा हात होता. त्यानंतर लिट्टेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करणारा भारत पहिला देश ठरला.

  • १९९२ मध्ये चीनने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.

  • १९९४ मध्ये ४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत मिस इंडिया सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.

आज यांचा जन्म

  • लेखक, समीक्षक ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी यांचा १९२८ मध्ये जन्म झाला. मौज, साधना वगैरे मासिकांतून यांचे बरेच नाट्यविषयक लिखाण प्रसिद्ध झाले आहे.

  • हिन्दी कवी, लेखक व उपहासकार शरद जोशी यांचा १९३१ मध्ये जन्म झाला.

आज यांची पुण्यतिथी

  • वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक ऑटो व्हॉन गॅरिक यांचे १६८६ मध्ये निधन झाले.

  • स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचे १९७९ मध्ये निधन झाले.

  • मराठी गायक छगन चौघुले यांचे २०२० मध्ये निधन झाले. ‘कथा चांगुणाची’, ‘कथा श्रावण बाळाची’, ‘आईचे काळीज’, ‘अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी’ असे छगन चौगुले यांच्या आवाजातील एकापेक्षा एक अल्बम रसिकांमध्ये लोकप्रिय आहेत.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result