सुविचार
आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
आंतरराष्ट्रीय योग दिवस : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यास १७५ देशांनी मान्यता दिली. त्यानंतर २२०१५ पासून योग दिवस जगभर साजरा करण्यात येत आहे.
आज काय घडले
१९४८ मध्ये सी. राजगोपालचारी हे स्वतंत्र भारतातील पहिले व अंतिम गव्हर्नर जनरल बनले.
१९४९ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. उच्च न्यायालयाचे उदघाटन २९ ऑगस्ट १९४९ मध्ये झाले.
१९९१ मध्ये पी. व्ही. नरसिंह राव भारताचे ९वे पंतप्रधान झाले. १९९१ ते १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते.
आज यांचा जन्म
भारतीय हिंदी लेखक, कादंबरीकार, लघुकथा लेखक व नाटककार विष्णू प्रभाकर यांचा १९१२ मध्ये जन्म झाला. त्यांना पद्मभूषण पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित केले आहे.
कवी, भाषांतरकार सदानंद रेगे यांचा १९२३ मध्ये जन्म झाला. त्यांचे अनेक कथासंग्रह, कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहे.
मराठी व हिंदी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री रीमा लागू यांचा १९५८ मध्ये जन्म झाला. सुमारे चार दशकांचा मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अनुभव असलेल्या रीमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केले.
आज यांची पुण्यतिथी
मराठी ऐतिहासिक आणि सामाजिक कादंबरीकार, लेखक द्वारकानाथ माधव पितळे यांचे १९२८ मध्ये निधन झाले. ते स्त्री शिक्षणाचे व पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते.
भारतीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार यांचे १९४० मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाच्या एक वर्ष आधी त्यांनी संघाची निश्चित अशी कार्यपद्धती तयार केली.
मराठी चित्रपट अभिनेता व गायक अरुण सरनाईक यांचे १९८४ मध्ये निधन झाले. १९६१ साली त्यांनी चित्रपटसॄष्टीत पदार्पण केले.
लेखक भालचंद्र दत्तात्रय खेर यांचे २०१२ मध्ये निधन झाले. त्यांची ११७ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांची एकूण पृष्ठसंख्या २५०००हून अधिक आहे.