सुविचार
रडणाऱ्या माणसाला आयुष्यात फक्त सहानुभूती मिळते आणि लढणाऱ्या माणसाला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभुती येते.
आज काय घडले
१८८४ मध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्डसच्या मैदानावर पहिला कसोटी सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया देशाच्या क्रिकेट संघामध्ये झाला.
१९२५ मध्ये अमेरिकेत उत्क्रांतीवाद शिकवल्याबद्दल जॉन टी. स्कोप्स या शिक्षकाला १०० डॉलरचा दंड करण्यात आला.
१९६० मध्ये सिरीमाओ बंदरनायके श्रीलंकेच्या ६ व्या पंतप्रधान बनल्या. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.
आज यांचा जन्म
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध भारतीय गुजराती साहित्यकार उमाशंकर जोशी यांचा १९११ मध्ये जन्म झाला.
गीतकार आनंद बक्षी यांचा १९३० मध्ये जन्म झाला. १९६४ पासून २००४ या कालावधीत हजारो गीतांचे गायन त्यांनी केले. फिल्मफेअर पुरस्कारासाठी ४० वेळा त्यांचे नामांकन झाले.
मराठी लेखक व सांस्कृतिक संशोधक डॉ. रा. चि. ढेरे यांचा १९३० मध्ये जन्म झाला.
पद्मभूषण व अर्जुन पुरस्काराने सन्मानित माजी भारतीय क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांचा १९३४ मध्ये जन्म झाला. ते भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष होते.
भारतीय क्रिकेट संघातील सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य चेतन चौहान यांचा १९४७ मध्ये जन्म झाला.
आज यांची पुण्यतिथी
महाराष्ट्रीयन मराठी बखर वाङ्मयाचे गाढे अभ्यासक, इतिहास संशोधक डॉ. र. वी. हेरवाडकर यांचे १९९४ मध्ये निधन झाले.
संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचे १९९५ मध्ये निधन झाले.
साहित्यिक राजा राजवाडे यांचे १९९७ मध्ये निधन झाले.
मराठी चित्रकार गोपाळराव बळवंतराव कांबळे यांचे २००२ मध्ये निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक ठरलेल्या मुघल-ए-आझम चित्रपटाचे पोस्टरदेखील त्यांनी रंगवले होते.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातल्या किराणा घराण्याच्या गायिका गंगूबाई हनगळ यांचे २००९ मध्ये निधन झाले. संगीताचे प्राथमिक धडे वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी आईकडून घेतले.