सुविचार
स्वतःला सिद्ध करताना...स्वत:मधला मी विसरून जावा लागतो.
आज काय घडले
१९६९मध्ये अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ओल्ड्रिन व मायकेल कॉलिन्स यांच्यासह अपोलो ११ हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेत पोहचले.
१९६९ मध्ये भारतातील १४ मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. राष्ट्रीयकरण होण्याच्या आधी देशामध्ये केवळ स्टेट बँक ऑफ इंडिया ही एकमात्र शासकीय बँक होती.
१९८० मध्ये मॉस्को येथे २२व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. या स्पर्धेत भारताला एक सुवर्णपदक मिळाले.
१९९३ मध्ये डॉ. बानू कोयाजी यांना समाजसेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला.
आज यांचा जन्म
स्वातंत्र्ययुद्धातील आद्य क्रांतिकारक मंगल पांडे यांचा १८२७ मध्ये जन्म झाला. १८५७ च्या उठावाची सुरुवात त्यांच्यांकडूनच झाली.
सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचा १९३८ मध्ये जन्म झाला. विज्ञानकथेवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली.
सन १९८३ सालच्या क्रिकेट विश्वकप विजेता संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांचा १९५५ मध्ये जन्म झाला.
दूरचित्रवाणीवरील इंग्लिश क्रिकेट समालोचक हर्ष भोगले यांचा १९६१ मध्ये जन्म झाला. ते क्रीडा पत्रकारही आहेत.
आज यांची पुण्यतिथी
बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे १९६८ निधन झाले.
जपानचे माजी पंतप्रधान झेन्को सुझुकी यांचे २००४ मध्ये निधन झाले.