लोकशाही स्पेशल

दिनविशेष 18 मार्च 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

Published by : Sakshi Patil

Dinvishesh 18 March 2024 : सध्या मार्च महिना सुरू झाला आहे. तर मार्च महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 18 मार्च या रोजी काय घडले त्या दिवशी काय महत्वाचे असणार याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?

२००१: सरोदवादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर.

१९६५: अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव १२ मिनिटे अंतराळात चालणारे पहिले वव्यक्ती ठरले.

१९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.

१९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास,

१८५०: हेन्री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली.

आज यांचा जन्म

१९६३: व्हेनेसा विल्यम्स - पहिल्या कृष्णवर्णीय आफ्रिकन-अमेरिकन मिस अमेरिका, गायक

१९४८: एकनाथ सोलकर - अष्टपैलू क्रिकेटपटू (निधन: २६ जून २००५)

१९३८: शशी कपूर - भारतीय सुप्रसिद्ध अभिनेते - पद्म भूषण, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार (निधन: ४ डिसेंबर २०१७)

१९२१: एन. के. पी. साळवे - भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय.चे अध्यक्ष (निधन: १ एप्रिल २०१२)

१९०५: विभावरी शिरुरकर - लेखिका (निधन: ७ मे २००१)

१९०१: तात्यासाहेब वीरकर - शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक कृष्णाजी भास्कर तथा

१८८१: वीर वामनराव जोशी - स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार (निधन: ३ जून १९५६)

१८६९: नेव्हिल चेंबरलेन - इंग्लंडचे पंतप्रधान (निधन: ९ नोव्हेंबर १९४०)

१८६७: महादेव विश्वनाथ धुरंधर - भारतीय चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट (निधन: १ जून १९४४)

१८५८: रुडॉल्फ डिझेल - डिझेल इंजिनचे संशोधक (निधन: २९ सप्टेंबर १९१३)

१८३७: ग्रोव्हर क्लीव्हलँड - अमेरिकेचे २२वे आणि २४वे अध्यक्ष (निधन: २४ जून १९०८)

१५९४: शहाजी राजे भोसले - यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती (निधन: २३ जानेवारी १६६४)

आज यांची पुण्यतिथी

२००३: ऍडम ओस्बोर्न - ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशनचे संस्थापक (जन्म: ६ मार्च १९३९)

२००१: विश्वनाथ नागेशकर - चित्रकार

१९४७: विल्यम सी ड्युरंट - जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनीचे सहसंस्थापक (जन्म: ८ डिसेंबर १८६१)

१९०८: सर जॉन इलियट - ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ (जन्म: २५ मे १८३१)

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा