सुविचार
इच्छा ही अशी विचित्र गोष्ट आहे, पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो.
आज काय घडले
१८५७ मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. १९९६ पर्यंत हे विद्यापीठ "बाँम्बे विद्यापीठ’ म्हणून ओळखले जात होते. १९९६ साली बाँबे शहराचे नाव बदलून मुंबई करण्यात आले.
१९८० मध्ये भारतीय अंतराळ संस्था इस्रोने एसएलव्ही-३ या अवकाशयानाद्वारे रोहिणी-१ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
१९९६ मध्ये उद्योगपती गोदरेज यांना जपानचा ऑर्डर ऑफ रायझिंग सन हा पुरस्कार प्रदान केला.
आज यांचा जन्म
दक्षिण आफ्रिकेचे स्वातंत्र्यसेनानी नेल्सन मंडेला यांचा १९१८ मध्ये जन्म झाला. ते आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.
पाकिस्तानी गझल गायक व गझल सम्राट मेहंदी हसन यांचा १९२७ मध्ये जन्म झाला.
कांचीपूरम येथील कांची कामकोटी पीठाचे ६९ वे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचा १९३५ मध्ये जन्म झाला.
भारतीय गायक सुखविंदर सिंग यांचा १९७१ मध्ये जन्म झाला. ‘दिल से’ या चित्रपटामधील ‘छैया छैया’ या गाण्यामुळे ते प्रसिद्धीझोतात आले.
चित्रपट अभिनेत्री सौंदर्या यांचा १९७२ मध्ये जन्म झाला. त्यांनी तेलुगू, कन्नड, मलयालम, तमिळ तसेच हिंदी चित्रपटांतून अभिनय केला.
सिने-अभिनेत्री व मॉडेल प्रियांका चोप्रा यांचा १९८२ मध्ये जन्म झाला. मिस वर्ल्ड ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत त्यांना विजेतेपद मिळाले होते.
अर्जुन पुरस्कार विजेता सर्वोत्कृष्ट भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती श्रीनिवास मंधाना यांचा १९९६ मध्ये जन्म झाला.
आज यांची पुण्यतिथी
थोर समाजसुधारक, लेखक, कवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे १९६९ मध्ये निधन झाले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे संचालक, मराठी, संस्कृत लेखक डॉ. गोविंद केशव भट यांचे १९८९ मध्ये निधन झाले.
ख्यातनाम शिक्षणतज्ञ, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाचे एक संस्थापक डॉ. मुनीस रझा यांचे १९९४ मध्ये निधन झाले.
चित्रपट अभिनेते आणि लोकसभा सदस्य राजेश खन्ना यांचे २०१२ मध्ये निधन झाले. एकेकाळी त्यांनी संपूर्ण चित्रपटसृष्टी व्यापून टाकली होती.