सुविचार
जगाला आवडेल ते कराल तर एक प्रॉडक्ट म्हणून राहाल आणि स्वतःला आवडेल ते कराल तर एक ब्रॅण्ड म्हणून जगाल.
आज काय घडले
१९४५ मध्ये अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी केली. त्यानंतर ६ ऑगस्ट १९४५ रोजी जापानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला.
१९६९ मध्ये चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-११ अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण करण्यात आले.
१९९८ मध्ये गुजरात सरकारने शाळेत प्रवेश घेण्याच्या वेळी पाल्याच्या नावानंतर वडिलांच्या नावाप्रमाणे आईचे नाव लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
आज यांचा जन्म
मुंबई येथील गोवालिया टँक मैदानावर प्रथम भारतीय राष्ट्रध्वज फडकवणाऱ्या क्रांतीकारक व शिक्षणतज्ञ अरुणा असफ अली यांचा १९०९ मध्ये जन्म झाला.
दक्षिण भारतातील ज्योतीर मठाचे मठाधीश व स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा १९१३ मध्ये जन्म झाला.
मराठी साहित्यिक वा. कृ. चोरघडे यांचा १९१४ मध्ये जन्म झाला. कथासंग्रहांशिवाय त्यांनी ९२ ललितलेख, चरित्रे, प्रबंध, पाठ्यपुस्तके लिहिले आहेत.
नाटककार व लेखक जगदीश चंद्र माथूर यांचा १९१७ मध्ये जन्म झाला.
पद्मश्री व अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी सर्वोत्कृष्ट भारतीय हॉकीपटू व कर्णधार धनराज पिल्ले यांचा १९६८ मध्ये जन्म झाला.
विकिपीडियाचे सहसंस्थापक लैरी सेन्जर यांचा १९६८ मध्ये जन्म झाला. जिमी वेल्स सोबत त्यांनी विकिपीडिया हे संकेत स्थळ सुरु केले.
अभिनेत्री कतरिना कैफ यांचा १९८३ मध्ये जन्म झाला. त्यांनी तेलुगू तसेच मल्याळी चित्रपटांतसुद्धा काम केले आहे.
आज यांची पुण्यतिथी
इतिहास संशोधन आणि इतिहास लेखक वासुदेव बेंद्रे यांचे १९८६ मध्ये निधन झाले. महाराष्ट्राचा १७ व्या शतकाचा इतिहासावर त्यांनी संशोधन केले.
नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन श्वाइंगर यांचे १९९४ मध्ये निधन झाले.