जगातल्या पहिल्या मशीनगनचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले. ती मशीनगन ३२ एमएमची होती.
सुविचार
संकट हे पाण्यासारखे असते. ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही; तर त्यात कसे पोहायचे ? ते शिकवण्यासाठी आलेले असते.
आज काय घडले
१७१८ मध्ये जगातल्या पहिल्या मशीनगनचे पेटंट जेम्स पक्कल यांनी घेतले. ती मशीनगन ३२ एमएमची होती.
१९२८ मध्ये मिकी माऊस कार्टून प्लेन क्रेजी या शो मधून पहिल्यांदा प्रसारित केले गेले.
१९६० मध्ये सोव्हिएत युनियनने स्पुतनिक ४ चे प्रक्षेपण केले.
आज यांचा जन्म
भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देवेंद्रनाथ टागोर यांचा १८१७ मध्ये जन्म झाला. ते ब्रह्मो समाजाच्या संस्थापकांपैकी एक होते.
नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्युरी यांचा १८५९ मध्ये जन्म झाला.
भारतीय स्वातंत्र्यसेनानी सुखदेव थापर यांचा १९०७ मध्ये जन्म झाला. जे. पी. सॉण्डर्स यास ठार मारण्याच्या कटात त्यांचा सहभाग होता.
नामवंत अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने यांचा १९६७ मध्ये जन्म झाला. त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले गेले आहे.
आज यांची पुण्यतिथी
स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचे १९९३ मध्ये निधन झाले.
जुन्या जमान्यातील चित्रपट व नाट्य अभिनेते सज्जन यांचे २००० मध्ये निधन झाले. १९५० ते १९८० दरम्यान त्यांनी अनेक चित्रपटात काम केले.