सुविचार
दिल्याने वाढत जातं...मग तो सेवेचा आनंद असो, मदत असो किंवा समाधान..!
आज काय घडले
१६६२ मध्ये इंग्लंड येथील रॉयल सोसायटीची स्थापना करण्यात आली.
१९१६ मध्ये जगभरात विमान, रोटरक्राफ्ट, रॉकेट, उपग्रह, दूरसंचार उपकरणे आणि क्षेपणास्त्रांची रचना आणि विक्री करणारी अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी बोईंगची स्थापना करण्यात आली.
१९५५ मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.
१९९६ मध्ये स्वाध्याय परिवारची स्थापना करणारे तत्वज्ञानी, आध्यात्मिक नेते, धर्म सुधारक पांडुरंग शास्त्री आठवले यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला.
१९९७ मध्ये महाराष्ट्रीयन पर्यावरणवादी कार्यकर्ता महेशचंद्र मेहता यांची रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
२००६ मध्ये सोशल नेटवर्किंग आणि मायक्रोब्लॉगिंग संकेतस्थळ टि्वटर सुरु झाले. ट्विटरच्या साहाय्याने २८० शब्दापर्यंत पोस्ट करता येते.
आज यांचा जन्म
खासदार आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांचा १९०३ मध्ये जन्म झाला.
जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांचा १९०४ मध्ये जन्म झाला. त्या ‘गानतपस्विन’ या उपाधीने ओळखल्या जातात.
विचारवंत, वक्ते व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. शिवाजीराव भोसले यांचा १९२७ मध्ये जन्म झाला. १९८८ ते ९१ या काळात ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु होते.
विद्वान, टीकाकार आणि लेखक नरहर कुरुंदकर यांचा १९३२ मध्ये जन्म झाला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे दोन वेळा ते अध्यक्ष होते.
दलित साहित्यिक माधव कोंडविलकर यांचा १९४९ मध्ये जन्म झाला.
आज यांची पुण्यतिथी
इटालियन सुप्रसिद्ध चित्रकार व विश्वातील सर्वात सुंदर चित्र मोनालिसाची निर्मिती करणारे लियोनार्डो दा विंची यांचे १५४२ मध्ये निधन झाले.
नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ हर्मान एमिल फिशर यांचे १९१९ मध्ये निधन झाले.
बालगंधर्व नावाने परिचित असलेले नारायण श्रीपाद राजहंस यांचे १९६७ मध्ये निधन झाले. रंगभूमीवर स्त्रिया अभिनय करीत नसतानाच्या काळात त्यांनी रंगवलेल्या स्त्री-भूमिकांमुळे बालगंधर्वांनी मोठी लोकप्रियता मिळवली.
कुटुंबनियोजनाच्या क्षेत्रात सलग साठ वर्षे कार्य करणाऱ्या सामाजिक डॉ. बानू कोयाजी यांचे २००४ मध्ये निधन झाले. ३०० गावांमध्ये कुटुंबनियोजनाच्या विविध योजना राबविल्या.